बार्शी : बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापिका विद्यालय, बार्शी येथे शिक्षक दिन उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बजरंग वाघमोडे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थान विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनुसया चौगुले यांनी भूषविले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रतिकांत हामणे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम व द्वितीय वर्षांमधील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये कु. किशोरी पाटील, कु. मयुरी देशमुख, कु. भाग्यश्री घोडके, कु. अज्ञाशा विधाते, कु. पायल ठोंगे, कु. तेजस्विनी जगताप, कु. सांची मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ. अनुसया चौगुले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार कु. साक्षी वायकर हिने व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राजक्ता नागटिळक व कु. सायली ताले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रमोद मांडे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे -प्रकाश आंबेडकर
एका वरिष्ठ नेत्याने मराठा आंदोलनाला चिथावणी दिल्याची माहिती, शिरसाटांचा रोख नेमका कोणाकडे ?