Latest Marathi News

BREAKING NEWS

आरोग्यसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा माझा संकल्प – चंद्रकांत पाटील

0

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यंदाचा त्यांचा वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. वाढदिवसादिवशी हार किंवा पुष्पगुच्छ नको तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन हि त्यांनी केले होते.

यानुषंगाने आरोग्य सेवेसाठी अनेकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि लोकसहभागातून मदत संकलन करुन पाटील यांनी मतदारसंघातील दुर्धर आजारांनी त्रस्त नागरिकांच्या उपचारासाठी भरीव मदत केली.

काल कोथरुडमधील मंगेश विष्णू हेडळकर यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आणि समर्थ वाळवणकर यांना यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत पाटील यांनी उपलब्ध करून दिली आहे. आरोग्यसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा माझा संकल्प असून कोणा गरजूंना जेव्हा याचा लाभ मिळतो त्याप्रसंगी लाभणारे समाधान हे शब्दात न मांडणारे असते अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.

कोथरूड भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हि मदत उपचार घेणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांना सुपूर्त करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.