Latest Marathi News

BREAKING NEWS

शेतात आढळला ७ फुटी इंडियन कोब्रा जातीचा साप

सर्पमित्र मधुकर राठोड यांनी सोडले नेसर्गिक अधिवासात

0

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील आप्पासाहेब गवसणे यांच्या शेतात ७ फुटाचा इंडियन कोब्रा नाग जातीचा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली.शंकरनगर येथील सर्पमित्र मधुकर राठोड यांनी क्षणांचा विलंब न करता तातडीने गवसणे यांच्या शेतात पोहचले आणि अत्यंत शिताफीने इंडियन कोब्रा या नाग जातीच्या सापास पकडून गवसणे परिवाराला धीर देत या नाग जातीच्या सापाबद्दल माहिती दिली.यानंतर सर्पमित्र मधुकर राठोड यांनी सदर नाग सापाला सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.