बार्शी |
अटक करून तात्काळ जामीनावर सोडणे करिता ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.हर्षवर्धन हरिश्चंद्र वाघमोडे वय- ४१ वर्ष (नेमणूक – बार्शी तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण, रा. भवानी पेठ बार्शी सोलापूर) असे लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.
तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा भादवि कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२७,५०६,५०७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक करून तात्काळ जामीनावर सोडणे करिता व सदर गुन्ह्यामध्ये पुढील मदत करणे करिता ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करून, तडजोडी नंतर ४०,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारताना सापळा कारवाई मध्ये पोलिस हेड कॉन्स्टेबल यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.