बार्शी |
२५ मार्च सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मोफत बाल हृदयरोग निदान शिबिरामध्ये (२ डी इको काडीओग्राफी) ० ते १८ वयोगटातील एकूण १३७ रुग्णांची (बालकांची) मोफत २ डी इको कार्डिओग्राफी ही पुण्याचे लहान मुलाचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगावकर यांच्यामार्फत करण्यात आली.
त्यांना पुढील मोफत उपचाराचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास आवर्जून उपस्थित असलेले बार्शी तालुक्यातील IMA प्रेसिडेंट डॉ तांबारे मॅडम,डॉ.मुकुंद तांबारे, मेडिकल सुपरिडंट डॉ.सचिन कदम, डॉ.शीतल बोपलकर, स्त्री रोग तज्ञ डॉ.रवींद्र माळी, सोलापूर चे सिव्हिल सर्जन डॉ.धनंजय पाटील,धाराशिव चे सिव्हिल सर्जन डॉ. गलांडे व नामांकित लहान मुलांचे डॉक्टर्स डॉ. विजयसिंह भातलवंडे, डॉ. युवराज रेवडकर, डॉ.नानासाहेब बारस्कर, डॉ. सुबोध केसकर, डॉ. घोंगडे इत्यादी डॉक्टरांची मोलाची मदत झाली.