Latest Marathi News

BREAKING NEWS

“सामाजिक चळवळीतील अग्रणी मुकुंद जानराव दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

बार्शी शहरांमधील हॉटेल व्यवसायिक मुकुंद जानराव व त्यांच्या पत्नी अंजली जानराव या दांपत्याच्या हस्ते १ मार्च रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचे नाव अग्रेसर आहे, त्यांचा मुलगा सुदर्शन जानराव हा उच्च विद्याविभूषित असून भारतीय रेल्वेमध्ये सेवेत आहे. सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने गौरविण्यात ही आले आहे. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण मुकुंद जानराव व अंजली या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.