बार्शी |
बार्शी शहरातील साई सेवा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन पद्माकर झालटे पाटील व त्यांच्या पत्नी सविता झालटे पाटील या दांपत्याच्या हस्ते २९ एप्रिल रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. पद्माकर झालटे पाटील हे साई सेवा नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून बार्शी पंचक्रोशीला सर्वपरिचित आहेत, गणेश मंडळाचे ते क्रियाशील सदस्या असून विविध उपक्रमात हिरेरीने सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण पद्माकर झालटे पाटील व सविता या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हासह तालुक्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्याख्यानमालेची ही आयोजन करण्यात येते.