बार्शी |
बार्शी येथील सनदी लेखापाल (Chartered Accountant) बालकिशन पांडुरंग जाजू व सौ. हेमा बालकिशन जाजू यांच्या हस्ते आजच्या अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. जाजू यांचा सामाजिक चळवळीतही सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. आज दिनांक २६ नोव्हेंबर अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण बालकिशन जाजू व सौ. हेमा जाजू या दाम्पत्यांने केले.
बालकिशन जाजू हे बार्शीतील सर्वात सीनियर चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांचा मुलगा महेश जाजू व मुलगी शिल्पा सोमानी हे दोघेही एम कॉम चार्टर्ड अकाउंटंट आहेत. जाजू हे माहेश्वरी समाज या संघटनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तसेच ते लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या सध्या खजिनदार पदावर आहेत.