Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर ; रविवारी पुरस्कार वितरण सोहळा !

0

सोलापूर |

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार  दि २५ डिसेंबर २०२२ रोजी  दुपारी १२ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली. 
         
पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक वृतपत्र व  वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. रविवार  दि २५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता सळई मारुती सभागृह, पत्रा तालीम येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
       
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, जिल्हा सरकारी वकील अँड.प्रदिपसिंग रजपूत, उद्योजक निलेश फोफलिया, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राकेश उदगीर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या सोहळयास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक महेश कासट,  संतोष अलकुटे, महेश ढेंगले, अभिजित होनकळस, रविशंकर जवळे, राजु भोसले, केशव भैय्या यानी केले आहे.

चौकट – 
हे आहेत पुरस्काराचे मानकरी 

अरविंद मोटे (सकाळ), संजय जाधव (दिव्यमराठी), शरीफ सय्यद (पुण्यनगरी), नंदु येच्चे (संचार), गौतम गायकवाड (तरुणभारत संवाद),  मनोज हुलसुरे (इन न्यूज),अभिषेक आदेप्पा (डि.पी.न्यूज), अदित्य केंगार(बी.आर.न्युज) आदी पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.