बार्शी |
बार्शी शहरातील शिवशक्ती बँकेमध्ये नोकरी करणारे महादेव मसे व सौ.पूजा मसे या दाम्पत्याच्या हस्ते अन्नपूर्णा २ डिसेंबर रोजी योजनेचे पूजन झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी या छोट्याशा खेड्यातून नोकरीसाठी महादेव मसे हे बार्शीमध्ये स्थायिक झालेले आहेत. महादेव मसे यांचा सामाजिक कामातही सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना ही गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहरांमध्ये कार्यरत आहे. या योजनेच्या माध्यमातून बार्शी शहरातील 200 पेक्षा जास्त गरजू नागरिकाला दोन वेळचे जेवण विनामूल्य दिले जाते, ही सेवा समाजातील दातृत्व असणाऱ्या व्यक्ती व मातृभूमी प्रतिष्ठानद्वारे चालवली जाते. याशिवाय अत्यंत मापक दरात बार्शी शहरातील दवाखान्यामध्येही ही सेवा पुरवली जाते, मातृभूमी हे कार्य गोरगरीब गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज महादेव मसे व सौ.पूजा मसे या दांपत्याच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेचे पूजन व वितरण करण्यात आले.