मुंबई: कोरोना व्हायरसचं संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील भाजपा सरकारकडून प्रेरणा घ्यावी, अशा शब्दांत संरक्षणमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी निशाणा साधला होता. तसेच महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे, अशी टीका देखील राजनाथ सिंह यांनी केली होती. या टीकेनंतर ठाकरे सरकारनेही राजनाथ सिंह यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा टोला देखील नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांना लगावला आहे.