Latest Marathi News

BREAKING NEWS

रंभापुरी महास्वामीजी इष्टलिंग महापूजा बार्शीमध्ये उत्साहात संपन्न

0

बार्शी |

बार्शी शहरात आयोजित श्रीमद रंभापुरी जगद्गुरु प्रसन्न रेणुक डॉ. वीर सोमेश्वर महास्वामीजी यांची वैभवशाली इष्टलिंग महापूजा उत्साहा मध्ये संपन्न झाली. रंभापुरी महास्वामीजींचे दि. ०१ एप्रिल २०२३ रोजी बार्शी शहरांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले.

बार्शी वैरागकर मठामध्ये महास्वामीजींचे वेदघोष, प्राथर्ना गीतांनी स्वागत होऊन दीप प्रज्वलाद्वारे धर्मसभेस आरंभ झाला. धर्म सभेमध्ये श्री अभिजीत अरुण वैरागकर यांनी प्रास्ताविकामध्ये बार्शी वैरागकर मठाचे लिं.श्रीमद रंभापुरी महास्वामी रुद्रमुनी देव शिवाचार्य यांच्या दिव्य कार्याचा उजाळा देऊन मठाच्या सुवर्ण इतिहास संक्षिप्त स्वरूपात सांगून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.

विद्यमान रंभापुरी महास्वामिनी आपल्या आशीर्वाचना मध्ये लिं. रंभापूरी जगद्गुरु रुद्रमुणी देव महास्वामीजींच्या दिव्य तेजस्वी कार्याची आठवण काढत महास्वामीजींचे धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. हा दिव्य आणि भव्य सोहळ्याचे स्वागताने ते खूप आनंदित झाले हे सुद्धा त्यांनी सांगितले.

धर्मसभेत मार्गदर्शनासाठी महास्वामी सोबत आलेले सिंदनूर आणि गुद्दापुर येथील शिवाचार्य, आणि बार्शी येथील ष. ब्र. श्रीगुरु परांडकर महाराज, ष.ब्र. श्रीगुरू माढेकर महाराज, ष. ब्र. श्रीगुरु औंधकर महाराज, ष. ब्र. श्रीगुरु मानूरकर महाराज, ष. ब्र. श्रीगुरु दहिवडकर महाराज, वेदमूर्ती बसवराज शास्त्री इत्यादी उपस्थित होते. दि २ एप्रिल रोजी महास्वामीजींचे वैभवशाली इष्टलिंग महापूजा उत्साहा मध्ये पार पडली या महास्वामीजींच्या इष्टलिंग पूजेमध्ये बार्शीतील व परिसरातील शिव भक्त मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपस्थित होते.

महास्वामीजींचा महावस्त्र आणि सुवर्ण देऊन सन्मान करण्यात आला. महास्वामीजींच्या पूजेमध्ये बार्शीतील, लातूर, कुर्डूवाडी, पुणे, इत्यादींचे देखील रुद्र मंडळ उपस्थित झाले होते. या २ दिवसाच्या दिव्य अशा धार्मिक सोहळ्यामध्ये सहभागी भक्तांच्या अन्नप्रसादाचे विशेष सहाय्य विश्वेश्वर सहकारी बँकचे संचालक सुभाष लडगे व म्हमाणे परिवार वडगाव(काटी) यांनी करून महास्वामिजिंच्या चरणी आपली सेवा समर्पित केली.
हा धर्मसोहळा यशस्वी करण्यासाठी मठाचे विश्वस्त यांच्यासोबत त्यांना साथ देणारे श्री मन्मथ स्वामी सेवा मंडळ, वीरशैव लिंगायत समाज बार्शी, समस्त महिला भजनी मंडळ, मन्मथ स्वामी सेवा मंडळाचे अध्यक्ष शैलेश घाणेगावकर, अशोक मठपती, प्रमोद चंद्रशेखर, प्रभुराज स्वामी, मल्लिकर्जुन धारूरकर, राम घोंगडे, श्री बुगडे सर, प्रकाश स्वामी, शैलेश वायचळ, विनू गुंगे, धनंजय वायचळ, महेश पकाले, सचिन होनराव, बाबा शिराळ, प्रवीण गाढवे यांनी सहाय्य केले आणि शेठ अगरचंद्र कुंकूलोळ प्रशाला, सिल्वर ज्युबिली हायस्कूल, अय्यंगार बेकरीचे मालक गिरीगौडा यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.