बार्शी |
हे मी अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित “मसनातल सोन” ही एकांकिका लिहिली त्यावेळी लिहिले होते.. त्या एकांकिकेतील प्रमुख पात्र भीमा जो स्वतःची आणि कुटुंबाची पोटाची भुक भगवण्यासाठी नको नकोते प्रयत्न करतो पण शेवटी भाकरी न मिळाल्या मुळे लेकराच्या आणि बायकोच्या चिंतेने आत्महत्या करायला निघतो आणि त्यावेळी आत्महत्या करताना त्याचा मित्र त्याला वाचवतो..
निराश होऊन रस्त्याने चलताना त्याला एका चिता दिसते आणि त्या चितेला ठेवलेला निवद पाहून तो ते घेण्यासाठी पुढे येतो आणि त्याच वेळी तो निवद खाण्यासाठी कुत्रही येत.. भुकेसाठी कुत्र्याच्या तोंडातिलही निवद तो हिसकावून घेतो.. तेंव्हा त्याला चितेच्या राखेत सोन सापडत आणि तिथून कष्ट करून भाकरी कामावणारा भीमा पोटाची भुक भागवण्यासाठी मडी उकरायला लागतो माणसातला भीमा भुतासारखा वागायला लागतो.. हे सगळ भुकेसाठी भाकरीसाठी होत..

हे आज लिहिण्यामागच कारण म्हणजे आजकितीतरी अशी भुकेने व्याकुळ असणारी माणस आपल्या आसपास भीमा सारखी फिरत असतात वेळीच त्यांची माणूस म्हणून भुक भागवन आपल कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य “मातृभूमी प्रतिष्ठान” ने जी “अन्नपूर्णा” योजना निराधर वयस्कर आणि हॉस्पिटल मधील गरीब रुग्णाच्या भुकेसाठी राबवली आहे या मार्फत पार पाडले जाते..
त्या भाकरीची पूजा करायला आकाश बनसोडे व सौ. प्रियांजली हस्ते करण्यात आले. रोज कितीतरी निराधार वयस्कर लोकांना मोफत आणि 12 हॉस्पिटल मधील रुग्णाना “अन्नपूर्णा ” मार्फत पोटभर जेवण पुरवले जाते.. एक बार्शीकर म्हणून खरच अभिमान वाटला..
माणसाने माणसाची भुक भागावन हे आपल्या प्रत्येकाच कर्तव्य आहे.. ही भुक कधीच न संपणारी आहे या सामाजिक कार्यासाठी महिण्यात लाखोंचा खर्च होतो..
बार्शीतील सर्वच नागरिकांना माझी कळकळीची विंनती या सामाजिक कामासाठी जर देणगी स्वरूपात आपण काही सहकार्य करू इच्छित असाल तर आपले स्वागत आहे..
मला सपत्नीक या भाकरीची पूजा करण्यासाठी बोलावलत त्याबद्दल “मातृभूमी प्रतिष्ठान” चे शतशः आभार, धन्यवाद