Latest Marathi News

BREAKING NEWS

आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांची अजित पवारांवर टीका

0

मुंबई | राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर आज मुंबईत खासदार शरद पवार यांचा तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले. तर शरद पवार यांनीही अजित पवार यांच्यावर पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार अन्य ८ नेत्यांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले आहेत. यावरुन आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.

कालच शरद पवार यांनी माझा फोटो न वापरण्याचे आवाहन केले होते. आज अजित पवार यांच्या बैठकीतील बॅनरवर शरद पवार यांचे फोटो वापरण्यात आले होते, यावरुन पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार म्हणाले, आपलं नाण चालणार नाही हे त्यांना माहित आहे, म्हणून ते माझा फोटो प्रत्येक बॅनरवर वापरत आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार म्हणाले, शिवसेनेसोबत जे झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरु. आपले काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. ते पुन्हा येण्यासाठी अस्वस्थ आहेत. मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे. माझ्या नाव, फोटोशिवाय यांचे नाणे चालणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले. या टिकेल अजित पवार काय प्रतिउत्तर देणार हे पहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.