Latest Marathi News

BREAKING NEWS

“प्राध्यापक मोहन शिंदे दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक मोहन शिंदे व त्यांच्या पत्नी त्यांच्या सुवर्णा शिंदे या दांपत्याच्या हस्ते १२ मार्च रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. ते कर्मवीर जगदाळे मामा यांच्या शिक्षण संस्थेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयांमध्ये मॅथेमॅटिक्स या विषयाचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे, अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. त्यांची दोन्ही मुले ही उच्च विद्याविभूषित आहेत. मुलगा रोहन शिंदे हा एमआयटी कॉलेज प्राध्यापक पदावर कार्यरत आहे तर मुलगी कांचन शिंदे ही पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करते.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण प्रा. मोहन शिंदे व सुवर्णा या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.