Latest Marathi News

BREAKING NEWS

पु.लं देशपांडे आणि वांगी…

0

पुलंच्या शेतीज्ञानाचा बळीराजाने कसा केला पर्दाफाश?

पुलं_स्मृतिदिन

विट्याच्या ग्रामीण साहित्य संमेलन.. राजवर्धन जाधव यांच्या संग्रहातून..

 

ग्रामीण विभागांत राहणाऱ्या माणसाला कोणतेही मार्गदर्शन करावे अशा प्रकारची माझी योग्यता नाही. याबाबतीत माझे गर्वहरण फार वर्षांपूर्वी खेड्यातच झाले आहे.

मी एका खेडेगावात शेताच्या बांधावरून चाललो होतो आणि शेतकरी वाफ्यामध्ये काहीतरी करीत होता. आम्ही साहित्यिक असल्यामुळे प्रत्येक विषयावर काहीतरी बोललेच पाहिजे, असा एक आम्हाला अहंकार असतो.

मी त्याला विचारले,
“याला कसले खत घातले म्हणजे चांगली वांगी येतील?”

तो म्हणाला, “याला माझ्या हाडाचे खत घातले तरी चांगली वांगी येणार नाहीत; कारण ते टोमॅटोचे झाड आहे.” 😃

– 1982 साली विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनात पुलंनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातून साभार.

Leave A Reply

Your email address will not be published.