Latest Marathi News

BREAKING NEWS

परीक्षा, करिअर यांबद्दलचा विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार… यामध्ये सहभागी व्हा , चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

0

मुंबई |

विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा , करिअर याबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. https://innovateindia.mygov.in/ppc-2023/ या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमात सहभागी व्हावे असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

परीक्षेचा ताण सोडण्याची आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा घेण्याची हीच वेळ आहे. भारतातील प्रत्येक विद्यार्थी ज्या संवादाची वाट पाहत आहे तो संवाद आता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा मार्गदर्शनपर संवाद होणार आहे. . विद्यार्थ्यांना त्यांची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

परीक्षा आणि जीवनाशी निगडित प्रश्नांसाठी एक मोठा जिवंत मंच आहे, तो म्हणजे परीक्षा पे चर्चा. काहीतरी नवीन शिकण्याचा हा एक अद्भुत अनुभव आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची पुन्हा संधी आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम ‘आता सहभागी व्हा'( Partcipate Now) या बटनावर क्लिक करा. स्पर्धा इयत्ता ९ वी ते १२ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. विद्यार्थी त्यांना दिलेल्या कोणत्याही थीमवर त्यांचे प्रतिसाद बटन सबमिट करू शकतात. विद्यार्थी त्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त ५०० शब्दात सादर करू शकतात. पालक आणि शिक्षक देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.