Latest Marathi News

BREAKING NEWS

जागतिक विमा परिषदेसाठी बार्शीतील दोघांची निवड ; यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार

0

बार्शी |

अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परीषद MDRT 2023 साठी पात्र झाल्या बद्दल बार्शी शाखेतील विमा प्रतिनिधी गणेश भाळवणे व रमेश गिरी यांचा सत्कार डॉ. लक्ष्मीकांतजी काबरा व अशोकजी हेडडा यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ बार्शी शाखेतील विकास अधिकारी रमाकांत कटकधोंड यांच्या युनिट तर्फे, त्यांच्या युनिट मधील गणेश भाळवणे व रमेश गिरी यांनी, जागतिक विमा परीषद MDRT 2023 साठी पात्र झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार बार्शीतील नामवंत डॉ. लक्ष्मीकांतजी काबरा व अशोकजी हेडडा यांच्या हस्ते करण्यात आला, शाखेचे वरिष्ठ शाखा अधिकारी तुषार घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला, कार्यक्रमास शाखेतील सर्व कर्मचारी व विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी,मित्र परिवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.