बार्शी |
ग्रामीण भागातील शेतरस्ते, शिवरस्ते शेतकरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने ‘ग्रामीण भागातील रस्ते पूर्ण स्थापित करा’ या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना देण्यात आले.
सध्या ग्रामीण भागात शेत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे, बरेच ठिकाणी पूर्वीचे रस्ते शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून नाहीसे केले आहेत, फार वर्षांपूर्वी शेततळे,शिवरस्ते सध्या रेकॉर्डला उपलब्ध आहेत मात्र प्रत्यक्षात अतिक्रमणे असल्याने वापरात नाहीत. आजची स्थिती व 50 वर्षाच्या स्थितीमध्ये खूप फरक झाला आहे सध्या यांत्रिक कारणामुळे चांगले रस्ते जवळचे रस्ते आवश्यक आहेत. काही शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे शिवरस्ते व शेत रस्ते गायब झालेले आहेत, नव्याने जलसंधारण कामासाठी काही शेतकऱ्यांचा विरोध असतो. शेतरस्ते व्यवस्थित नसल्यामुळे पिकांची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना त्रासदायक होत आहे, या सर्व परिस्थितीचा विचार करून शेतरस्ते पुर्नस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने योग्य तो कायदा करावा अशी मागणी शेतरस्ते संघर्ष समितीच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव माने, सचिव किरण गाढवे, कार्याध्यक्ष प्रतापराव जगदाळे, उपाध्यक्ष विकास जाधव, खजिनदार मुरलीधर चव्हाण, समितीचे सदस्य सतीश गोडगे,राजाभाऊ देशमुख,शशिकांत ठोंबरे यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.