पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर… ग्रामस्थांशी साधला संवाद
पुणे |
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुणे ग्रामीण भागात ठिकठिकाणी भेटी दिल्या आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक ठिकाणी चंद्रकांत पाटील यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी निगडे गावात भेट दिली. तेथे त्यांचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. इथल्या माता-भगिनींनी औक्षण केलं तर ज्येष्ठांनी गुलाबपुष्प दिले. त्यांच्या प्रेमानं भारावून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद नेहमी असेच पाठीशी राहोत, हीच अपेक्षा, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भांबोली आणि येलवडी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच त्यांनी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी शेटे कुटुंबासोबत अनौपचारिक गप्पा झाल्या. या भेटीत गट्टी जमली निवृत्तीभाऊंची छोटी नात ‘शौर्या’सोबत… तिनं अजिबात न घाबरता गोष्ट सांगितली आणि कविताही म्हटली. तिचा निरागस धीटपणा खरंच कौतुकास्पद, असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्दच्या ग्रामस्थांशी देखील त्यांनी संवाद साधला. देशातील प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी प्रयत्नशील आहेत. घराघरात पाणीपुरवठा होण्यासाठी त्यांनी योजना कार्यान्वित केल्या असून जिल्ह्यात त्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राज्य सरकारतर्फेही अनेक योजना सुरू असून ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामविकासाचे प्रयत्न कायम सुरू राहतील, अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत योग्य व्यक्तींना निवडून द्यायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं.
चंद्रकांत पाटील यांनी खेड तालुक्यातील साकुर्डी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने ही जनतेच्या विकासासाठी विविध लोकोपयोगी कामे करत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. देवोशी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाल्याबद्दल सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार देखील केला.
सह्याद्रीच्या कुशीतल्या मावळ तालुक्यातील भोयरे ग्रामस्थांशी देखील चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनांची माहिती त्यांना दिली. ‘हर घर नल से पानी’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी कामं सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारही विविध योजनांतून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहेत. गावांच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही या निमित्तानं चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुका आहेत. या निवडणुकीतयोग्य उमेदवार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी मावळचे माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिगंबरशेठ भेगडे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं, त्यांच्या घरी जाऊन दिगंबरभाऊंच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली आणि भेगडे कुटुंबायाचं सांत्वन केलं. त्याचबरोबर तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. विश्वनाथराव दाभाडे यांचं देखील नुकतंच निधन झालं. त्यांच्या घरी जाऊन विश्वनाथरावांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच दाभाडे कुटुंबाचं सांत्वनही केलं.
चंद्रकांत पाटील यांनी या दौऱ्यावेळी रा. स्व. संघाचे पुणे जिल्हा माजी संघचालक आणि तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सुरेशभाई शाह जी यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली. त्यांच्या निधनामुळे अनेक संस्था, संघटनांचा आधारवडच हरपला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.