Latest Marathi News

BREAKING NEWS

अदानी – मोदी प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी राहुलजी गांधी यांच्यावर कारवाई – आमदार प्रणिती शिंदे

0

सोलापुर |

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हुक़ूमशाही मोदी सरकारने राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेलवे स्टेशन जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी रिबीन बांधून मूक सत्याग्रह आंदोलन केले.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, भारत जोडोच्या माध्यमांतुन राहुलजी गांधी जनतेचे प्रश्न सतत मांडत आहेत. त्यांची वाढणारी लोकप्रियता आणि मोदी- अदानी भ्रष्टाचार प्रकरणावरुन संसदेत आणि संसदेबाहेर सातत्याने आवाज उचलत आहेत. आजपर्यंत अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्याविरुद्ध आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही. पण देशातील लोकांचा पैसा बुडवून पळून गेलेल्या अनेक उद्योगपती मोदींच्या नावावरुन राहुलजी गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून शिक्षा केली. आणि लगेच त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना घर ख़ाली करण्याची नोटिस देण्यात आली. असे करून राहुलजी गांधी आणि विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी तोंडाला काळी पट्टी लावून मुक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राहुलजी गांधी यांनी सत्य परिस्थिती सांगितली महागाई, बेरोजगारी विरुद्ध आवाज उचलले एक सामान्य माणसाने, विरोधकांनी जे केले पाहिजे तेच राहुलजी गांधी यांनी केले. त्यामुळे मोदींना असुरक्षिता वाटत आहे त्यांचा अहंकार दुखावला गेला. मोदी सरकार घाबरून गेले आहेत. विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला एवढा त्रास देत आहेत तर सामान्य माणसाची गत काय? राहुलजी वरील कारवाईमुळे जगात चुकीचा संदेश जात आहे. मोदी- अदानी प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी, JPC चौकशीवरुन लक्ष हटविण्यासाठी राहुलजी गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण राहुलजी गांधी यांनी डरो मत चा संदेश दिला असून देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारच्या हुक़ूमशाही विरुद्ध लढा चालू ठेवतील.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस अँड मनीष गडदे, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी महापौर सुशीला आबूटे, आरिफ शेख, मा. नगरसेवक तौफीक हत्तूरे, शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, मा. नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.