बार्शी |
बार्शी शहरातील श्री महावीर धर्मार्थ दवाखान्यामध्ये अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या अस्मिता कळसकर व त्यांचे वडील अरुण कळसकर या दोघांच्या हस्ते १७मार्च रोजी अन्नपूर्णा योजनेचे पुजन करण्यात आले. अरुण कळसकर यांचे बार्शी शहरातील हिरामण हॉस्पिटल येथे शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे. कळसकर कुटुंबीयांचा अनेक सामाजिक उपक्रमातही हिरीरीने सहभाग असतो. अस्मिता कळसकर यांच्या अर्पिता व अंकिता या दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण अस्मिता कळसकर व त्यांचे वडील अरुण कळसकर यांनी केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते.