राज्यात शिंदे गट आणि भाजप सरकारला अजित पवारांच्या रुपाने नवा जोडीदार मिळाला आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘येत्या दोन-तीन दिवसात कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असं भाकीत आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी बीडीडी प्रकल्पाला भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आता काय झाले आहे की खरा मुख्यमंत्री कोण हे संभ्रम आहे. येत्या दोन तीन दिवसात कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल’.
आगामी सिनेट निवडणुकीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ही तिसरी निवडणूक आहे, या निवडणुकीला हाईप करण्याची गरज नाही. ज्यांना मदत करायची आहे. ते करू शकतात’. अजित पवार आणि शरद पवार भेटीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘सामनात जे आले, ती पक्षाची भूमिका आहे. संजय राऊत यांनी जे मांडलं, तीच आमची भूमिका आहे’.
बीडीडी प्रकल्पाबाबत सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘अपेक्षित होता तसा, या प्रकल्पाचा विकास चालू आहे . आपल्या काळात हा प्रकल्प सुरू झाला होता. माझी सवय आहे की, जे काम आमच्या काळात सुरू झाले आहे, त्यावर मी लक्ष ठेवून असतो. या लोकांच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. २५ मजले तयार झाले आहे, मी प्रकल्प बघून आलो, परिसरात २ बीएचके आहे’.
युतीसाठी भाजपची ऑफर, पण… राज ठाकरे यांचं मोठं विधान !
भाजपची मनसेला युतीची ऑफर? राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची चर्चा