Latest Marathi News

BREAKING NEWS

भविष्यातही पोलीस दलाच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेण्यावर भर, चंद्रकांत पाटलांची ग्वाही

0

पुणे : पोलीस मित्र संघटनेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस दलातील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी हा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पाटील म्हणाले मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर असतो. त्यासाठी ते मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांना पोलिसांची घरे अद्ययावत करण्यासाठी मदतीसाठी आवाहन करत असतात. त्यानुसार गेल्या काळात कोल्हापूर आणि आता पुणे पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला आहे. भविष्यातही पोलीस दलाच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेण्यावर भर असेल, अशी ग्वाही यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी संघटनेचे संथपक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्यासमवेत डि.जी.पी. एन.डि.पाटील, डि.सि.पी. गिल आणि पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीउपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.