Latest Marathi News

BREAKING NEWS

येणारे काही दिवस महाराष्ट्रात तापमान वाढण्याची शक्यता, घराबाहेर पडताना काळजी घ्या

0

मुंबई : महाराष्ट्रात काही दिवसांपासून तापमानात सतत चढउतार होत आहे. कधी अवकाळी पाऊस तर गारपीटीमुळे राज्यातील बळीराजा हवालदिल झालं आहे. वातावरण बदलामुळे राज्यातील काही भागात गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमाण 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

मात्र आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उन्हाचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

अशातच आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यभरात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 17 मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेपासून आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.