Latest Marathi News

BREAKING NEWS

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची आता खैर नाही, राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

0

मध्यमान करून आणि बेशिस्ततणे वाहन चालवणाऱ्यांमुळे अनेक अपघात झाल्याचे दिसून आले आहे तसेच अनेकांना निष्कायजीपणे वाहन चालवणाऱ्यामुळे आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने ठोस पाऊल उचललेली आहेत. विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. या नव्या नियमामुळे अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

रस्त्यावर बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालिवण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यूच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.