Latest Marathi News

BREAKING NEWS

“या ५-६ महिन्यात ८-१० भावी मुख्यमंत्री झालेत त्यात…. , शहाजी बापूंचा थेट राज ठाकरेंना टोला

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गट, भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला होता तत्पूर्वी सकाळी राज ठाकरे यांच्या सभेआधी सेना भवन परिसरात, “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”, अशा आशयाचे बॅनर लावले होते. यावरून आता शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी टोला लगावला आहे.

शिवसेनेची गुढी आम्ही पुन्हा उभी करू, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे संजय राऊत यांना नवीन गुढी उभी करावी लागणार आहे. याचा अर्थ राऊत यांनी शिंदे यांचे नेतृत्व वाढलेले आहे. मोठे झालेले आहे. हे मान्य केले, असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यासंदर्भात विचारले असता, भावी मुख्यमंत्री या पाच-सहा महिन्यांत सात-आठ झालेत. भावी होण्याला काही अडचण नाही. अजूनही दहा-बारा भावी मुख्यमंत्री झालेत तरी अडचण नाही. परंतु, उद्या निवडणूक झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होणार, असा मला विश्वास वाटतो, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.