Latest Marathi News

BREAKING NEWS

“झाडांची कत्तल; क्रीडाधिकाऱ्यांना पाच लाखांचा दंड…!”

0

सोलापूर |

सोलापूर शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावरील ५ झाडे महानगरपालिकेची परवानगी न घेता तोडल्याप्रकरणी प्रभारी क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांना पाच लाखांचा दंड ठोठविण्यात आला आहे. या कारवाईने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय मैदानावरील पाच झाडे महानगरपालिकेची परवानगी न घेता तोडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी करून बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी महापालिकेने गुरुवारी (दि. २३) निर्णय घेत प्रभारी क्रीडाधिकारी ९७ सत्येन जाधव यांना पंधरा दिवसात पाच लाखांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. नियमानुसार प्रत्येक झाडाला एक लाख रुपये याप्रमाणे पाच लाखांचा दंड केला असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान, ही झाडे वाळलेली असल्याचे सांगत क्रीडा विभागाने खुलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अद्याप त्यांची पुढील भूमिका स्पष्ट झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.