Latest Marathi News

BREAKING NEWS

“जलसाठे संरक्षित करणे ही काळाची गरज..!” – अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे

0

नागपूर |

प्रदूषणामुळे जलसाठातील पाणी दूषित होत असून नदीसह जलसाठे संरक्षित करणे ही काळाची गरज आहे. लोकसहभागाने जलसाठे संरक्षित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. आजच्या काळात नदी प्रदुषण हा मोठा विषय आहे. त्यासाठी जलजागृती होणे गरजेचे आहे. कोणत्याही कार्यक्रमात पाण्याचा अपव्यव टाळला पाहिजे. पाण्याच्या बचतीसाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. एका कार्यक्रम बचत भवन येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी श्री ठाकरे बोलत होते.

यावेळी निरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, माहिती संचालक हेमराज बागुल, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे, जल अभ्यासक डॉ. प्रविण महाजन, गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकूर देसाई, जिल्हा समन्वयक पदमाकर पाटील, बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत असल्यामुळे शुद्ध जल मिळणे कठीण होत आहे त्यामुळे जलसाठे संरक्षित करणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे सांगताना रवींद्र ठाकरे म्हणाले पाणी प्रदुषणामुळे पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व प्रजाती सुद्धा नष्ट होत आहेत त्यासाठी शुध्द पाणी कसे टिकवून ठेवता येईल, यावर चिंतन होणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.