Latest Marathi News

BREAKING NEWS

“2024 नाही, तर 2047 पाहून काम करा”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंत्र्यांना आवाहन

0

नवी दिल्ली |

फक्त आगामी लोकसभा निवडणुकीकडे नुसते बघू नका, तर 2047 च्या दिशेने काम करा, असे आवाहन पंतप्रधानांनी बैठकीत उपस्थित सर्व मंत्र्यांना केले. यासोबतच संसदेचे पावसाळी अधिवेशन जुन्या संसद भवनातच होणार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-20 बैठकीपूर्वी प्रगती मैदानात बांधलेल्या नवीन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय समूहाच्या बैठकीत त्यांच्यासमोर मांडण्यात येणार्‍या मुद्द्यांवरही नरेंद्र मोदींनी सविस्तर चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.