Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ?

0

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा होत्या. मात्र गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वजनदार खातं असून त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवारांच्या गटाला मिळालेली मंत्रीपदे कोणती?

अजित पवार- अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
अदिती तटकरे- महिला व बालविकास
माणिकराव कोकाटे- कृषी
बाबासाहेब पाटील- सहकार
नरहरी झिरवाळ- अन्न व औषध प्रशासन
दत्तात्रय भरणे- क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
मकरंद जाधव- मदत आणि पुनर्वसन

Leave A Reply

Your email address will not be published.