शिंदे गट आणि शिवसेनामध्ये आता जोरदार शाब्दिक चकमक सुरु झाली आहे अशातच शिवसेना आमदार वैभव नाईक यांना पाडण्यासाठी उदय सामंत यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.आता विनायक राऊत यांच्या या आरोपाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.विनायक राऊत हे अध्यात्मिक व्यक्ती आहेत, सिंधुदूर्गातील घाटीखाली उभं राहून सत्य काय आहे त्यांनी सांगितलं पाहिजे असा टोला सामंत यांनी राऊतांना लगावला आहे.
सिंधुदूर्गातील देवळाच्या घाटीखाली उभं राहून सांगितलं तर खरं आहे असं माणण्यात येईल.राऊत यांनी खरं सांगावे माझ्याकडून कुणी पैसे घेतले? राऊत वयाने मोठे त्यांच्या आरोपांना उत्तर देणं योग्य नाही, काळ आणि नियती हेच त्यावर उत्तर देतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून आता कोकणातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
उदय सामंत यांनी वैभव नाईकांना पाडण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. विनायक राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. आता राऊत यांच्या या आरोपाला सांमत यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. राऊत हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्या आरोपांना उत्तर देणं योग्य होणार नाही. येणारा काळच त्यांच्या आरोपांची उत्तरे देईल.विनायक राऊत हे अध्यात्मिक व्यक्ती आहेत, सिंधुदूर्गातील घाटीखाली उभं राहून सत्य काय आहे त्यांनी सांगितलं पाहिजे असा टोला सामंत यांनी राऊतांना लगावला आहे