Latest Marathi News

BREAKING NEWS

रश्मी शुक्ला, मोहित कंबोज यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

0

 

श्मी शुक्ला यांनी काल, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज हेदेखिल फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. फोन टॅपिंग प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नेमकी हे भेट कोणत्या कारणासाठी घेतले हे अद्याप समजू शकलेले नाहीये.

फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या काळात चौकशी सुरु झाली होती. या फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणाचं पुढं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते. तर, बुधवारी केलेल्या ट्वीटमध्ये या नेत्याची संपत्ती, परदेशातील मालमत्ता आणि प्रेयसीच्या नावाने जमवलेला पैसा आदींचा गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले होते. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.