बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप नेते शाहनवाज हुसैन यांना उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. शाहनवाज हुसैन यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यानेर आणि मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते मात्र आता शाहनवाज हुसैन
याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात शाहनवाज हुसैन यांच्यावर बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. एवढेच नाही तर तीन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिला आहेत. त्यामुळे शाहनवाज हुसैन यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून यामुळे भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडाली आहे.
दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने कनिष्ठ न्यायालयाने याचिका दाखल करत शाहनवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शाहनवाज हुसैन यांनी एप्रिल 2018 मध्ये नवी दिल्लीतील छतरपूर येथील फार्महाऊसवर आपल्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला होता.