आमच्यावर भाजपाकडून सातत्याने टीका होतेय. घराणेशाहीचा मुद्दा पुढे येतो मान्य आहे. कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करतेय. मी प्रतिभा व शरद पवार यांची कन्या आहे याचा मला सार्थ अभिमान. परंतु मला भाजपाला एक साधा प्रश्न विचारायचाय, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान, प्रफुल पटेल, दुष्यंत चौटाला ही सगळी मंडळी घराणेशाहीचं मेरिट सांगणारे नाहीत का ? तुमच्या बरोबर असले तर मेरिट आम्ही जर बरोबर असलो तर घराणेशाही हे कसं चालेल? असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळेंना भाजपावर जोरदार शाब्दिक प्रहार केला.
हेही वाचा :NCC प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
भाजपाच्या पदाधिकार्यांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली तरी चालतं. मात्र आमच्या बाबतीत घराणेशाही. माझ्या मतदार संघात येऊन भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी काय म्हटलं होतं? राष्ट्रवादीकॉंग्रेस म्हणजे भ्रष्ट पार्टी आहे. मला आता भाजपाकडून स्पष्टीकरण हवंय, एनसीपी महाराष्ट्रात सत्तेत कशी ? तुमच्या बरोबर आलो तर चांगले आणि विरोधात गेलो तर वाईट असं नसतं ना. सध्या लोकशाही आहे, लोकशाहीत असं घडत नसतं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.