सध्या माजी दिगवन्त आमदार मुक्त टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्यामूळ महाविकास आघाडीने थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता आता याच मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला आवाहन दिले आहे, टिळक कुटुंबात उमेदवारी दिली असती तर निवडणूक बिनविरोध करू म्हणता; तर मग उद्या दुपारी ३ पर्यंत सांगा, आम्ही लगेच हेमंत रासने यांचा अर्ज मागे घेतो आणि टिळक कुटुंबात उमेदवारी देतो, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला दिले.
बावनकुळे यांनी रात्री उशिरा शैलेश व कुणाल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत हाेते. ते म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्या एका फोनवर माघार घेत निवडणूक बिनविरोध केली होती. कसबा निवडणुकीत असे झाले तर आम्ही शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे जाहीर आभार व्यक्त करू.असे म्हणत पुन्हा एकदा बिनविरोध करण्यासाठी भाजपने आघाडीला आवाहन केले आहे.
निवडणूक नाही झाली तर भाजपचा उमेदवारच निवडून येईल आणि झाली तरीही भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आमच्या उमेदवारावरून कोणत्याही समाजाचे लोक नाराज नाहीत. टिळक कुटुंबीयही नाराज नाही. भाजपात मेरीट पाहून उमेदवारी दिली जाते, असेही बावनकुळे म्हणाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने दोन्ही जागेवर उमेदवारी जाहीर करून भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत.