तुर्की आणि सीरियातील काही भागामध्ये 7.8 ते 7.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला आणि या भूकंपामुळे एका क्षणात सर्वकाही उध्वस्त झालं. मोठाल्या इमारती पत्त्यां साखळ्या कोसला होत्या तसंच अनेक स्वप्न बेचिराख झाली. या ढिगाऱ्याखाली अनेकनाची स्वप्न गाडली गेली तर अनेकांचे संसार कायमची उध्वस्थ झाली. या ढिगाऱ्याखालीच अनेकांनी अखेरचा श्वासही घेतला. कायम जगण्याची काहीच शाश्वती नसते हेच पुन्हा एकदा या नैसर्गिक आपत्तीमुळं सिद्ध झालं.
सुरुवातीला 30, 60, 500 आणि आता थेट 4000 इतके बळी या भूकंपानं घेतल्याची अधिकृत माहिती नुकतीच समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मात्र भलतीच भीती व्यक्त करत हा आकडा 10 हजारांच्याही वर जाऊ शकतो असं म्हटलं आहे. त्यामुळं आता जगभरातून तुर्की आणि सीरियासाठी अनेकांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. हे भयाण वास्तव पाहता हा दशकातील सर्वात मोठा भूकंप असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.तर दुसरकीकडे तिथे तुर्कीमध्ये मृत्यूचं तांडव आजही सुरु असून, शहरं मातीच्या ढिगाऱ्याखाली उध्वस्त होत असतानाच दिसून येत असून अनेक निष्पापांचा बळी गेल्याचं चित्र काळीज पिळवटून टाकत आहे.
आज अनेक फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून तुर्की आणि सीरियातील गंभीर परिस्थिती जगापुढे आली आहे. यातच एक असा फोटो व्हायरल होत आहे, जो मोठ्या प्रमाणावर अनेकांनी रिशेअरही केला आहे. ‘आजच्या दिवसातील काळीज तिळतिळ तोडणारा फोटो…’, अशा कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये एका ढिगाऱ्यापाशी श्वान बसलेला दिसत आहे. एका मृत व्यक्तीपाशी तो बसला असून, मोठ्या आशेनं तो कुणाकडेतरी पाहत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर हा श्वान तुर्कीच्या भूकंपातून बचावल्याचं वृत्तही काहींनी प्रसिद्ध केलं आहे. मात्र या फोटोचा त्या भूकंपाशी काहीही संबंध नाहीये.