माझे आजोबा चोरेंगाळे असा आरोपच युवासेना प्रमुख अधित्य ठाकरे यांनी थेट शिंदे गटावर लगावला होता आता या आरोपांना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी थेट आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पुरुष असून ते एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. आजोबा चोरले म्हणणे चुकीचे असून हा मनाचा कोतेपणा आहे, असे प्रत्युत्तर दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. आदित्य ठाकरे हे काल नाशिक दौऱ्यावर आले होते यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी शिंदे सरकारमधील आमदारांवर घणाघात केला आहे. यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे
हा मनाचा कोतेपणा आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पुरुष असून एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. मग कुणीतरी म्हणेल की, आमचे छत्रपती शिवाजी महाराज चोरले, कुणी म्हणतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चोरले, कुणी म्हणतील महात्मा फुले चोरले, अस थोडी चालतय… म्हणून नुसतं नावाने होत नाही तर महापुरुषांनी जी शिकवण कार्यकर्त्याने अंगिकारणे महत्वाचे असल्याचे भुसे म्हणाले. अशी शिकवण भाषणापुरती मर्यादित न राहता ती कृतीतून पुढे आली पाहिजे, असेही ठणकावून सांगितले.
यंदा नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमालेचे शंभरावे वर्ष साजरे होत आहे. या निमित्ताने बैठकीनंतर ते भुसे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मागील सहा महिन्यांपासून तीन शब्दांच्या पुढे एक शब्द नाही, आता कीव येते आहे. ठाण्यामधून निवडणूक लढविणार या आव्हानावर भुसे म्हणाले, आमच्या काही ग्रामपंचायत सदस्यांनीही आव्हान दिले आहे की, आमच्या ग्रामपंचायतीतून निवडणूक लढवून दाखवा. या बोलण्याला काही अर्थ असतो काय. उगाच लोकांची काहीतरी दिशाभूल करायची. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. शेतकरी, कामगारांच्या संदर्भातले प्रश्न असतील त्या विषयावर चर्चा केली पाहिजे. त्यावर कोण बोलत नाही, चांगलं काम केलेलं असेल, त्याच्यावर बोललं पाहिजे.