Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे फक्त दिखावा अन् नौटंकी

0

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात त्यांनी शिंदे गटासह भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊदे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे. या राजकारण्यांमधील गद्दारी जाऊदे ही प्रार्थना केली आहे, असे उद्गार उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज दूसरा दिवस असून या दौऱ्यावर भाजपाने निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कधीही विदर्भ दौरा केला नाही व कोणत्याही प्रकारची मदत विदर्भाच्या लोकांना केली नाही. मात्र, त्यांना काय कळवळा आला की, ते विदर्भ दौरा करत आहेत. हे फक्त नौटंकी असून देखावा आहे, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

पुढे बोलताना महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्रीची कधी पायरी उतरले नाही, तुम्ही कधी मंत्रालयात गेला नाहीत आणि आता तुम्ही सत्ता गेल्यानंतर विदर्भाचा दौरा करत आहात, असा निशाणा गिरीश महाजन यांनी साधला. तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित शाह भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर नरेंद्र मोदीजी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही अशी टीका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.