Latest Marathi News

BREAKING NEWS

“एकपात्री नाटकांमध्ये तुकारामाची भूमिका करणारे अभिनेते सोमण व त्यांच्या टीमचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन…!”

0

पुणे |

यंदा श्री क्षेत्र देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारीसोबत जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकारामांचे जीवनचरित्र आणि त्यांचे कार्य सर्वांना समजावे यासाठी एकपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची या एकपात्री नाट्यप्रयोगात भूमिका साकारणारे अभिनेते योगेश सोमण यांचा सन्मान पुण्याचे पालकमंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

हा नाट्यप्रयोग पाहताना अनेक वारकरी बांधवांनाही अश्रू अनावर झाले होते म्हणत संत तुकाराम महाराजांचे कार्य इतक्या भक्तीभावाने अभिनयातून साकारणाऱ्या योगेश सोमण आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पाटील यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील निवासस्थानी भजन संध्येचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. दास झालों हरीदासांचा । बुद्धीकायामनें वाचा ॥ म्हणत या कार्यक्रमात विठ्ठल नामाच्या जयघोषात सर्वजण तल्लीन झाले.

यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड विधानसभा भाजप असाध्यक्ष पुनीत जोशी तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.