अमरावती | शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असू नआज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. ठाकरे यांच्या आगमनापुर्वीच रविवारी शहरात राणा-ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचे चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळाले. तर आज हनुमान चालिसा पठणाची मागणी राणा समर्थकांनी केली. पण ती मागणी पोलिसांनी फेटाळून लावली आहे.
आज उद्धव ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर असून येथील विश्रामगृहात ते दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे शहरात पोस्टर वॉरनंतर राणा समर्थकांनी हनुमान चालिसा पठणाची तयारी केली पण पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तरीही हनुमान चालिसा पठण करण्यावर समर्थक ठाम असल्याचे दिसले. हे पाहता पोलिसांनी कारवाई सुरू केली असून गर्ल्स हायस्कूल चौकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. तसेच, रवी राणांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे अमरावतीत दाखल झाले असता काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर ठाकरे यांच्या भेटीला विश्रामगृहाकडे रवाना झाल्या आहेत. स्वागताची अमरावतीची परंपरा आहे त्यामुळे आम्ही स्वागतासाठी आलो आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, पोस्टर वॉरबाबत बोलताना त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका करत हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले