Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदाराने गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त केले ट्विट

0

काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहेत. शिवसेनेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक नेते उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजपसोबतच्या सत्तेत सामील झाले.त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. आज नार्वेकर यांनी एक ट्विट करत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

प्रसारमाध्यमांमध्ये तसेच काही भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे नार्वेकर देखील ठाकरेंना सोडणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच नार्वेकर यांनी हे ट्विट केले आहे. ‘मानणीय गृहमंत्री श्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो’ अशा आशयाचे ट्विट नार्वेकर यांनी केलं आहे.

अनेक दिवसांपासून नार्वेकर हे देखील उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरु होती. दसरा मेळावा असो वा ठाकरे गटाला नवीन मिळालेले चिन्ह असो मिलिंद नार्वेकर यांनी नेहमीच उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचे दाखवले आहे.मात्र शहा यांना शुभेच्छा दिल्यानंतर नव्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्याचे दिसून येते. अशात आता नार्वेकर याला काही उत्तर देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.