नमस्कार,
कधीही आणि कुठेही कार्यकर्त्यांच्या फोन घेणारा आणि समाधानकारक ॲक्शन घेणारा नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाने लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांची नोंद घेतली.त्याच नोंदीची आठवण देणारा अनुभव राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत मला आला.
त्याचे झाले असे, माझ्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”या पुस्तकातील ७५ दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये देवेंद्र फडणवीसही आहेत.पुस्तक प्रकाशनानंतर पुस्तक आणि पुस्तकासाठी ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या फडणवीस यांच्या रेखाचित्राची फ्रेम भेट देण्याची माझी इच्छा होती.त्यानुसार एके दिवशी तसा मानस व्यक्त करणारा एक एसएमएस मी सहज देवेंद्रभाऊंना पाठविला. त्यानंतर मेसेज पाठविल्याचे मी विसरुनही गेलो! एक दिवस अचानक मला उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी केतन पाठक यांचा फोन आला. केतन मला म्हणाले,”साहेबांना तुम्ही एस.एम. एस. केला होता ना! साहेबांनी उद्या भेटायला बोलावले आहे…” मला तो सुखद धक्का होता.म्हटलं तर ही घटना काहींना फारशी महत्त्वाची वाटणारही नाही. पण मला मात्र या घटनेला सामाजिक मूल्य आहे असे वाटते. कारण राजकारणात संस्कृती विकसित होते ती आशा घटनांमधूनच! देवेंद्रभाऊंच्या निरोपानुसार ठरल्या दिवशी त्यांना भेटण्याची मी तयार केली होती. त्यांना नेमक्या त्याच दिवशी अचानक दिल्लीला निघावे लागले आणि त्या दिवसाच्या सगळ्या अपॉइंटमेंट रद्द झाल्या!.. आज त्यांना भेटण्याचा योग आला आणि “एस एम एस आणि ॲक्शन”ची आवर्जून आठवण झाली. महाबळेश्वर भिलार येथे येत्या 29 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाची निमंत्रण पत्रिका मी, सातारा जिल्हा अध्यक्ष विकास भोसले, उपाध्यक्ष संजय कदम, भिलारचे अधिवेशन संयोजक व राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, दीपक नलावडे व कुंदन हुलावळेंनी त्यांना दिली. माझे पुस्तक व चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्राची फ्रेमही भेट दिली… केवळ एसएमएसवर झटपट ॲक्शनचा अनुभव महाराष्ट्रभर अनेकांना नेहमीच येत असल्याचे समजले आणि लिहिण्याचा मोह झाला… थँक्स देवेद्रभाऊ!
-राजा माने.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScoTFkns-Z3P4s_JYAZA2jPRhGS9c_4X2bQ1HX4-vxaUVqquA/viewform?usp=sf_link …….जे सदस्य काही तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन नोंदणी करु शकत नाही त्यांनी 99210 77388 या फोन पे नंबरवर २०० रुपये पाठवून नाव नोंदणी करावी ही विनं
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट