मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काही दिवसापूर्वी कर्जच्या बोलाखाली आत्महत्या केली त्यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या पोलीस नितीन देसाई मृत्यू प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे.
काही वर्षांपूर्वी नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीकडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अमदार नितेश राणे यांनी नितीन देसाई मृत्यू प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नितीन देसाई यांच्या निधनासंदर्भात असलेली माहिती आम्ही देवू असं वक्तव्य भाजप अमदार नितेश राणे यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा रंगत आहेत. चौकशी झाल्यानंतर आमच्याकडे जी माहिती आहे ती समोर आणू. इंडस्ट्रीमधील बहुतेक लोकांना माहिती आहे, की कशा प्रकारे जोर-जबरदस्ती केली जायची. प्रविण दरेकर यांनी सांगितलं, जेव्हा नितीन देसाई उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. पण ते भटले नाहीत..’
‘उद्धव ठाकरे यांची नजर एनडी स्टुडिओवर होती. मराठी माणसाला उभं करायचं नाही. स्वतःचे पैसे नंदकुमार चतुर्वेदीकडे ठेवायचे. एक मराठी माणूस मोठा झाला आहे. त्याचा देखील स्टुडिओ बळकावायचा प्रयत्न.. याचा २४ तास क्रर्यक्रम असयाचा…’ असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता आमदार संतोष बांगर यांचे सडेतोड प्रतिउत्तर