महाराष्ट्रातील टोल नाक्याच्या मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना टोल नाक्यावर अडवल्याने मनसैनिकांनी टोल नाका फोडल्याचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले होते.त्यानंतर मराठी अभिनेत्री ऋजुता देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने व्हिडीओ शेअर करत तक्रार केली होती.
आता लोकप्रिय अभिनेते आणि कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टोल नाक्यांवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टनं पुन्हा एकदा टोल नाक्याचा वाद समोर आला आहे.किशोर कदम यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किशोर कदम यांनी त्यांना आलेला टोल नाक्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी कशा प्रकारे सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला कात्री बसली याविषयी सांगितलं आहे.
सौमित्र यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले की ‘मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर 240 टोल घेतात… मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात ? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्या बद्दल कुणी बोललं का ? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात ? अरे लूट थांबवा रे ही… लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ? कुणाकडे तक्रार करायची ? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत ?’ अशी पसित फेसबुकवर केली आहे.
उद्धव ठाकरे यांची नजर नितीन देसाई यांच्या एनडीए स्टुडिओवर; या नेत्याचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता आमदार संतोष बांगर यांचे सडेतोड प्रतिउत्तर