उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल हिंगोली येथे सभा पार पडली या सभेत आमदार संतोष बगर यांचा डसणारा साप असा उल्लेख करून जोरदार निशाणा साधला. आता उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेवरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे येड्याची जत्रा आहे, अशी टीका संतोष बांगर यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाने माझा बाप चोरला. ही बाप चोरणारी टोळी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचाही आमदार संतोष बांगर यांनी समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांचे आहेत. त्यामुळे आमचा बाप चोरला असं कुणीही म्हणू नये, असं प्रत्युत्तर बांगर यांनी मीडियाशी संवाद साधताना दिलं आहे. संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. यावेळी ते बोलत होते
आमचा बाप चोराला हे म्हणणं आता बंद करावं. एखादा म्हणेल आता आमचा देव चोरला म्हणून मग महादेव कुणी एकाचे होतात का? त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हे आमचे सर्वांचे आहेत. त्यामुळे कुणीही म्हणू नये की ते आमचे बाप आहेत. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप आहेत, असा पलटवार संतोष बांगर यांनी केला.
गेल्या 38 वर्षांपासून मी शिवसेनेत आहे आणि गेल्या 14 वर्षापासून मी जिल्हाप्रमुख या पदावर ते काम करतोय. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना मी गुंड वाटलो नाही का? मी गुंड आहे. मी गोंडूस आहे म्हणून. त्यावेळेस हेच उद्धव ठाकरे म्हणायचे की बाळासाहेबांचा शिवसैनिक असाच पाहिजे. ज्या शिवसैनिकांच्या अंगावर केस नाही ते माझे शिवसैनिक होऊच शकत नाही, असे बोलणारे देखील हेच उद्धव ठाकरे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
अजितदादांच्या विकास म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा अपमान
भुजबळांचं भाषण थांबवणाऱ्या बीडकरांचे जितेंद्र आव्हाडांनी आभार