Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन, “तुम्हाला मनापासून सांगतो……”

0

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करुन महाविकास आघाडीच्या अडचणी वाढवल्या असून संताप शिवसैनिक विरोधात शिंदे गट असा संघर्ष आता संपूर्ण माहाराष्ट्रात पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे भवितव्य शिंदे गटाच्या आमदारांच्या निर्णयावर अवलंबून राहिले आते अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीस पूर्व बंडखोर आमदारांना आवाहन केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन करत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात.आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत.

आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही’अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. ‘माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू .

कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू ‘ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.