Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर मंचावर एकत्र

0

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त भीमशक्ती आणि शिवशक्तीचे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र दिसणार आहे. २० नोव्हेंबरला शिवाजी मंदिरमध्ये ‘प्रबोधन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण या दोन्ही नेत्यांच्या हस्ते होणार असल्याचे वृत्त आहे. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांचे राजकीय सूत जुळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांत युतीची चर्चा होत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार असल्याने राज्यात युतीची चर्चा पुन्हा एकदा रंगणार आहे. हे दोन्ही नेते एकत्र आल्यावर काय बोलतात आणि एकमेकांना युतीचा इशारा देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत स्पष्ट सांगितले होते. “निवडणूक आल्यावर राजकीय समीकरणे घडतील. सध्या तरी युती आणि आघाडी करावी या संदर्भात कुणालाच उत्सुकता नाही. माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.” असे ते म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.