मुंबईतील १५४ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.या पाडकामामुळे 36 मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येईल. मध्य रेल्वेवर बहुतांश लोकल गाड्यांच्या फे-या दादरपर्यंत होतील. तर हार्बर मार्गावर बहुतांश फेऱ्या या वडाळ्यापर्यंत चालवण्यात येणार आहेत.
19 आणि 21 नोव्हेंबरला बहुतांश मुंबई पुणे एक्स्प्रेस गाड्यांसह इतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा 154 वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी 27 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 36 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे मार्गावरील इंटरसिटी, डेक्कन, सिंहगड, प्रगती, डेक्कन क्वीन यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील धोकादायक कर्नाक बंदर उड्डाणपूल 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजल्यापासून पाडण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. 20 नोव्हेंबर रोजी मुंबई-नांदेड तपोवन, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी, मुंबई-जालना जनशताब्दी, मुंबई-मनमाड विशेष गाडी, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेससह अन्य काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.