Latest Marathi News

BREAKING NEWS

‘एक दिवस समुद्रावर’ या उपक्रमाला चंद्रकांत दादांची उपस्थिती

0

मुंबई |

जवानांच्या सामर्थ्यांची, युद्ध कौशल्याची तसेच त्यांच्या अतिशय खडतर जिवनमानाची लोकप्रतिनिधींना ओळख व्हावी, आणि आपल्या जवानांप्रती सर्वांमध्ये आदराची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून ‘एक दिवस समुद्रावर’ उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती लावली.

त्याचाच एक भाग म्हणून नौदलाचे सामर्थ्य, त्याचे युद्ध कौशल्य आणि दैनंदिन जीवनमान याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी नौदलातील जवानांनी आपल्या विविध युद्ध नौकेवर सादर केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके, हेलिकॉप्टर ऑपरेशन, एअरक्राफ्ट कॅरिअर आदी पाहून आपल्या जवानांप्रती स्वाभिमान वाटला. आपल्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत, या भावनेने त्यांच्या प्रतिचा आदर शतपटीने वाढला. अशी प्रतिक्रिया चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.